तरुण शेतमजुरांची गळफास घेऊन आत्महत्या. #Suicide #Agriculturelaborers

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चंद्रपूर जिल्हात राजुरा तालुक्यातील हिरापुर गावात आज दिनांक १५/७/२०२१ ला रात्रौ 2 वाजताच्या सुमारास विलास रामदास शेरकुरे वय 32 वर्ष या शेतमजुरांनी गळफास घेवून आत्महत्या केली. घरातील आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. शेतमजुरीची कामे करायचं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असल्याने घरात लागणार जीवनावश्यक वस्तू, आरोग्य, आर्थिक संकटांना तोंड ध्यावे लागत होते. #Suicide #Agriculturelaborers
त्यांचे घर टीन पत्रे आणि बाबूंनी बनवलेले टाटव्याचे आहे. त्यांचा कुटुंबात पत्नी, मुलगी आणि एक मुलगा असा छोटा परिवार आहे. हातावर आणायचे आणि पानावर खायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले.
शासनाने त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.