Top News

शुल्लक कारणावरून वाद गेला विकोपाला. #Argument #Beating #death


मारहाणीत एकाचा मृत्यू; याप्रकरणी आरोपीला अटक.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- तालुक्यातील सोनुर्ली येथे शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीतून एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक १४ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. #Argument #Beating #death
प्राप्त माहितीनुसार मृतक विशेषराव आत्राम वय ४५ व प्रशांत हंसकर या दोघात गावातील चौकात कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे पर्यावसन हाणामारी झाले. यात विशेषराव जलपती आत्राम याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाला उर्वरित तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवण्यात आले.
याप्रकरणी आरोपी प्रशांत हंसकर वय २८ याला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास कोरपना ठाणेदार सदाशिवराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव व कोरपना पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने