युवकाची गळफास लावून आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- येथील वॉर्ड क्रमांक तीनमधील रहिवासी नागेश्वर कचरू गरडकार वय अंदाजे 26 युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली. ही घटना आज 22 एप्रिल सकाळी 11 वाजताच्या च्या सुमारास उघडकीस आली. #Suicide
नागेश्वर गरडकार हा गवंडी मिस्त्री काम करीत असून तो घरी एकटाच राहत होता. घटनेच्या वेळी घरात कोणीच नव्हते. नागेश्वरच्या मागे त्यांची आई व विवाहित बहीण आहे. भिसी पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. आत्महत्येची वेळ व नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.