(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मूल:- चीचपली वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या उपवन परिक्षेत्र केळझर मधील दाबगावं मक्त बिटात काल सायंकाळी ४:०० वाजताच सुमारास वाघाने झडप घालून शंकर जुवारे यांच्या दोन गुरांना ठार केल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असल्याने शेतीची मशागत करताना मोठी धमछक होत आहे. #Tigerattack
तरी वनविभाग यांनी जातीने लक्ष देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाही देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. #mul
दरवर्षी शेकडो गुरांना वाघ्याच्या हल्यात बळी पडावे लागत असून आता वाघ आणि मानव संघर्ष सुद्धा नित्याचे झाले आहे. तर वाघ्याच्या हल्यात गुरांसह माणसांचा ही मृत्यू होत आहे. त्यामुळे वन विभागणी मानव प्राणी व जंगली प्राणी या दोन प्रणांवर यांच्यातील नाते याबाबत मंथन करून उपाय योजणे गरजेजे असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे. #ForestDepartment