(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- चामोर्शी-हरणघाट-मुल रस्ता मंजूर होऊन बराच कालावधी झाला परंतु अजून पर्यंत या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे तात्काळ बुजवून मंजूर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली आहे. #Fillthepits
आमदार डॉ. देवराव होळी यांनी या रस्त्याची पाहणी केली असता या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले दिसून आले. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून लवकरात लवकर खड्डे न बुजविल्यायास लोकांचा नाहक बळी जाण्याची शक्यता या खड्ड्यांमुळे निर्माण झाली आहे. #Chamorshi
त्यामुळे प्रशासनाने सदर खड्डे तातडीने बुजवावे व मंजूर झालेल्या नवीन कामाची सुरुवात लवकरात लवकर करावी अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या रस्त्याची पाहणी करताना केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे चामोशी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख उपस्थित होते. #gadchiroli