तीन वर्षांनंतर फरार व्यवस्थापकाला अटक. #Arrested

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील गांधी चौकात प्रतिष्ठा महाबचत लि. या नावाने २०१५ मध्ये पतसंस्था सुरु करण्यात आली. गडचिरोलीचे श्यामकुमार मडावी हे अध्यक्ष, तर सुनील येरमे हे व्यवस्थापक होते. गावागावांत एजंट नेमून ग्राहकांना विविध योजना आणि दामदुपटीने आमिष दाखवून पतसंस्थेत पैसे जमा करायला लावले. कालावधी पूर्ण झाल्यानंतर पतसंस्था बंद करून मडावी, येरमे यांनी पळ काढला. या प्रकरणाची काही ग्राहकांनी २०१८ मध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर श्यामकुमार मडावी याला पोलिसांनी अटक केली. मात्र व्यवस्थापक येरमे हा फरार होता. #Arrested
मागील तीन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या फरार व्यवस्थापकाला शोधण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर सोपविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक खाडे यांनी तपास सुरू केला. सुनील येरमे हे ब्रम्हपुरी येथे एका घरी भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून येरमे याला ब्रम्हपुरी येथून अटक केली आहे.