Top News

ऑनलाईन गेमच्या नादात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या. #Suicide


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- शंकरपूर येथून जवळच असलेल्या झरी येथील एका युवकाने ऑनलाइन गेमच्या नादात आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सांयकाळी घडली. विकास जगदेव गजभे (२२) असे मृतकाचे नाव आहे. आई-वडील शेतकरी असून, आई-वडिलांनी त्याला एक छोटेसे किराणा दुकान गावातच टाकून दिले होते. #suicide
विकासला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. या नादात तो हजारो रूपये हरला. त्यामुळे पुन्हा ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे लागत असल्याने बुधवारी त्याने आपल्या बऱ्याच मित्रांना फोन करून पैशाची मागणी केली होती. त्यातील एक दोन मित्रांनी त्याला पैशाची मदत केली. #onlinegame
  मित्राने दिलेले पैसे हरल्यामुळे तो निराश झाला होता. या विवंचनेतच त्याने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. शंकरपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहे. #police

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने