Top News

वाघ मानवी मृतदेहाचे लचके तोडत होता. #Tigerattack

हौशी युवक सेल्फी आणि चित्रिकरणात होते मग्न.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
यवतमाळ:- पांढरकवडा वन विभागाच्या झरी तालुक्यातील झरी जामणी वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने पुन्हा एकदा विदर्भात दहशत निर्माण केली आहे. मांडवी बीटमध्ये असलेल्या पिवरडोल शिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका तरुण ठार झाला. अविनाश पवन लनगुरे (१७) असे या मृत तरुणाचे नाव आहे. #Tigerattack
शनिवारी सकाळी हा वाघ शिकार फस्त करीत असल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वाघाने तरुणावर हल्ला केल्याची माहिती समजताच पिवरडोल, पाटणबोरीसह जवळच असलेल्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. अनेकांनी या वाघाचे व्हिडीओ चित्रीकरण केले, तर अनेकांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी या वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु आपल्याच मस्तीत शिकार फस्त करीत असलेल्या या वाघाने दाद दिली नाही. शेवटी पाच तासांनंतर वाघ जंगलात निघून गेला. पाटणबोरीजवळ असलेल्या पिवरडोल येथील हा तरुण शुक्रवारी रात्री गावाजवळ असलेल्या शेतशिवारात शौचास गेला होता. मात्र रात्री तो घरी न परतल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. पहाटे गावातील काही लोक शेतात जात असताना त्यांना मोबाइल व रक्त पडलेले आढळले. आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना झुडपात वाघ शिकार फस्त करीत असल्याचे दिसले.
मांडवी वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाच वाघांचा मुक्त संचार आहे. या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने