जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. #Tigerattack


कक्ष क्रमांक ९१ मधील घटना; परिसरात भितीचे वातावरण.
पोंभूर्णा:- तालुक्यातील गंगापूर नविन जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ९१ मध्ये चरण्यासाठी गेलेल्या गायीवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. #Tigerattack
पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गंगापूर नविन जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ९१ मध्ये गुराखी गुरे ढोरे चारत असतांना झुडूपात दब्बा धरुन बसलेल्या वाघाने कडपातील गाईवर हल्ला चढविला यात गाय ठार झाली.
सदर मृत गाय गंगापूर नवीन येथील सत्यवान झुंगाजी शिंदे यांच्या मालकीची होती. यामुळे गाईच्या मालकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सदर घटनेचा पंचनामा वनविभागाच्या पथकाने केले असून तात्काळ आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत