ट्रॅक्टरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू. #Accident #death

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- गडचांदूर-कोरपना मार्गावरील आसन खुर्द,या गावाच्या नाल्याजवळ एका ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याची घटना १७ जुलै रोजी रात्री अंदाजे ११ च्या सुमारास घडली. प्रशिक सुरेश शेंडे वयवर्ष २३ रा.आसन खुर्द असे दुचाकीस्वाराचे नाव असून सदर युवक नांदाफाटा येथील एका नातेवाईकांकडे जेवण करून स्वगावी परतत असताना अगदी गावाजवळ त्याची दुचाकी ट्रॅक्टरला धडकली. त्याला उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. #Accident #death
मृतकाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारी वरून गडचांदूर पोलीसांनी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर चालकमालक तिखट रा.पिपर्डा याला अटक करून ट्रॅक्टर जप्त केला. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)