उपसभापती महेशजी देवकते यांची ग्राम पंचायत परमडोलीला भेट. #Grampanchayat(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील अतिदुर्गम भागात आसलेल्या ग्राम पंचायत, परमडोली ला जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेशजी देवकते यांनी भेट दिली. त्यावेळी परमडोली, कोठा, परमडोली (तांडा) या गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. परमडोली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली असता, तेथील इमारत ही नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने, त्याबाबत आवश्यक पाठपुरावा करुन दुरुस्त करण्याकरीता प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल असे कळविल तसेच प्रसूतीगृह चे बांधकाम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचे तेथील आरोग्य सेविकेने समस्या मांडल्याने आरोग्य उपकेंद्राकरीता प्रसुतीगृह बांधकामाचे प्रस्ताव योग्य मार्गाने संबंधित विभागांकडे सादर करुन निरसन करण्याबाबतचे ग्वाही उपसभापती महेशजी देवकते यांनी दिली.


दरम्यान उपस्थितांना व गावातील 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोविड-19 लसीकरण करून घेण्याबाबात जन जागृती करण्यात आली.
#Grampanchayat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत