🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार. #Tigerattack


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेकाडी गावातील धाडू वडगू भोयर (65) हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आलेली आहे.वनविभाग ला माहिती देण्यात आलेली असून वनविभाग ची चमू घटनास्थळी पोहचले आहे. #Tigerattack
टेकडी येथील धाडू भोयर आपले स्वतःचे बैल घेऊन चरायला जवळच्या जंगलात गेला होता. काल सायंकाळी साडे चार वाजता चे दरम्यान वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. भांबावलेले बैल घरी परत आले, मात्र धाडू परत न आल्याने त्याचा शोधा शोध घेतला असता, आज सकाळी कक्ष क्रमांक 305 मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.
गावाचे नजीकच वाघाचे हल्ले होत असल्याने, शेतकरी-गावकरी भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी हजर झाले असून प्रेताचा पंचनामा केला जात आहे. सध्या सावली तालुक्यात रोजच वाघ,बिबट चे हल्ले होत असून नागरिक व वनविभाग या घटनाने त्रस्त झाले आहेत.