जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण. #Dedication

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- नागभीड येथे आपुलकी फाऊंडेशन च्या दोन वर्षांपूर्वीच्या एका कार्यक्रमात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी एक वर्गखोली बांधून देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार नागभीड येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे जि.प.निधीतून एक वर्गखोलीचा निधी मंजुर करून एका वर्षात बांधकाम पूर्ण करून दिलेला शब्द पाळत चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या हस्ते या वर्गखोलीचे लोकार्पण करण्यात आले.


   यावेळी उद्घाटक म्हणून आमदार बंटीभाऊ भांगडीया होते तर अध्यक्ष स्थानी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांची उपस्थिती होती . प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य क्रिष्णा सहारे, नागभीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे, पंचायत समिती सभापती प्रफुल खापर्डे,उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर,ज्येष्ठ नेते वसंत वारजूरकर,तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके, नगरसेवक शिरीष वानखेडे ,रुपेश गायकवाड,दशरथ उके,नागभीड केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.मंगला कोतकोंडावार,शाळेचे मुख्याध्यापक चिंचोळकर सर,चन्ने मॅडम,नाईक मॅडम, सहारे मॅडम,भाकरे मॅडम यांची उपस्थिती होती. #Dedication