Top News

लिंगनडोह ते पेदाआसापूर या दोन्ही गावाचा संपर्क तुटला. #Damaged(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- कारण या अतिपावसामुळे लिंगनडोह ते असापूर या मार्गामध्ये 2 पूल आहे आणि त्या दोन्ही पण पूलामध्ये महापुरामुळे मोठे गड्डे पडले आहे आणि रोड पण वाहून गेला आहे , विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर सुदामभाऊ राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहनी केली असता, लगेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून पुलाचे काम 10 दिवसाच्या आत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.


कारण त्या मार्गाने कोणतेही चारचाकी वाहन जाऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी तोच मार्ग आहे कोणतेही माल शेतात नेने म्हणजे त्या मार्गशिवाय पर्याय नाही.
10 दिवसाच्या आत पुलाचे काम पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुदाम राठोड युवा आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी दिला आहे.
 #Damaged

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने