वैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. #Vaingangariver(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात प्रचंड मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरी, रायगड, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी दरड कोसळून मृत्यूच्या घटना समोर आल्या. कोल्हापुरात तर 2019 ची पुनरावृत्ती व्हावी असा पूर आला. या सगळ्या घटना घडत असताना चंद्रपुरातही गेल्या दोन दिवसात प्रचंड पाऊस पडला. या दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याच्या घटनाही समोर आल्या. #Vaingangariver

गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन सध्या 2250 क्युमेक्सने सुरू असलेला विसर्ग दि. 24/07/2021 सायंकाळी 18:00 वाजेपर्यंत 4500-5000 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात आले आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या