🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास. #Death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:-पत्नीची हत्या करुन पतीने झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळला होता, तर पत्नी घरात जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र उपचारादरम्यान तिनेही अखेरचा श्वास घेतला आहे. पतीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली आहे. #Death
नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील आमराई वॉर्ड परिसरात मंगळवारी ही घटना उघडकीस आली. सुरज माने (वय 28 वर्ष) आणि रत्नमाला माने (वय 25 वर्ष) असं मयत पती-पत्नीचं नाव आहे. मंगळवारी सकाळी घराच्या अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरजचा मृतदेह आढळला होता, तर घरात रत्नमाला जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान रत्नमालाचा देखील मृत्यू झाला. #Adharnewsnetwork
पत्नीला मारहाणीनंतर पतीचा गळफास

प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून सुरजने सोमवारी रात्री पत्नीला जबर मारहाण केली होती. मारहाणीत पत्नी जखमी झाल्याने मंगळवारी सकाळी गळफास घेऊन सुरजने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. तर पतीच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे रत्नमालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जखमांवरुन स्पष्ट झाले आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत