326 नागरिकांपैकी 55 लाभार्थी ठरले पात्र.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहामध्ये योजनांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मराठी बाणा सामाजिक संस्था तसेच भारतीय जनता पार्टी महानगर मंडळ यांच्या वतीने आयोजित केला होता. #Chandrapur
या योजनेमध्ये 326 नागरिकांनी सहभाग घेतला व त्यामधून 55 नागरिक लाभार्थी पात्र होऊ शकले. या मेळाव्यामध्ये बाबुपेठ वार्डातील, भिवापुर वॉर्ड, महाकाली कॉलरी, माता नगर चौक, लालपेठ कॉलरी, दुर्गा नगर, आंबेडकर नगर, इंग्लाज भवानी वार्ड मधील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक प्रदीपजी किरमे रामजी हरणे,चंदनभैया पाल मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, दिवाकर पुड्टवार, अमोल नगराळे, कुणाल गुंडावार, सुभाष ढवस, हे होते. #Adharnewsnetwork
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना उरकुडे, निर्मला उरकुडे, संदीप पिंगे, पराग मलोडे, बातो ताई, रेखा चन्ने माया पडवेकर, आदित्य उरकुडे, यांनी आता अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे संचालन अमोल नगराळे तर कार्यक्रमाचे आभार नगरसेवक प्रदीप किरमे यांनी मानले.