(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२१ च्या परीक्षा दि. १०/०८/२०२१ पासून ५ पाळीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आली. प्रथम पाळीतील परीक्षा व्यवस्थीतपणे सुरु झाली मात्र दरम्यान एकुण ३२४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने सकाळी ११.३० ते दु. ०२.३० वाजे पर्यंत सर्व अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा स्थगीत करण्यात आल्या. त्यानंतर सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरळीतपणे सुरु झाल्या. सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत २५२ अभ्यासक्रमांतुन एकुण ६२३४६ विद्यार्थ्यांपैकी ५४२४२ ( ८७ % ) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून उर्वरीत विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे.
B.Com, B.Sc B.A परीक्षांचे वेळापत्रक पहा..
सदर अभ्यासक्रमांतील परीक्षांचे पेपर विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर आठ तास उपलब्ध राहणार आहे व अशा परीस्थितीत काही विद्यार्थी अशा कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहीले असल्यास अशा विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा विद्यापीठाद्वारे घेवून विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेतल्या जाईल.
#Adharnewsnetwork
आज दि. १०/०८/२०२१ रोजी निर्माण झालेल्या सर्व अडचणी विद्यापीठाने दुर केलेल्या असून दि. ११/०८/२०२१ रोजी पासून पुढे होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांतील सर्व विषयांच्या परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार पार पाडल्या जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठातर्फे सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी नियमित वेळापत्रकाप्रमाणे सर्व परीक्षा द्याव्या. #Gondwana #University