Click Here...👇👇👇

शेतीच्या जुन्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या. #Murder

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- शेतीच्या जुन्या वादामधुन लहान भावाने मोठ्या भावाला यमसदनी पाठविल्याची घटना तालुक्यातील सिंतळा येथे घडली. सिंतळा येथील रहीवाशी विश्वनाथ पुंजाराम वैरागडे (६५) आणि सुनिल पुंजाराम वैरागडे (४२) दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षापासुन वडीलोपार्जीत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादामधुन लहान भाऊ सुनिल वैरागडे याने मोठा भाऊ विश्वनाथ वैरागडे याचा काटा काढला. #Murder
सविस्तर वृत्त असे की आज दुपारी ११.३० वा. चे सुमारास विश्वनाथ म्हैसी घेवुन घराकडे जात असताना सिंतळा रेगडी मार्गावरील नाल्याजवळ पाळतीवर असलेल्या सुनिलने पाठीमागेहुन येवुन कुऱ्हाडीने विश्वनाथच्या डोक्यावर वार केले. कुऱ्हाडीचे वार जबर असल्याने विश्वनाथ जागीच गतप्राण झाला.
 घटनेची माहीती होताच ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी सहका-यांसह घटनास्थळ व सिंतळा येथे जावुन सुनील वैरागडे याला ताब्यात घेतले आहे. मृतक विश्वनाथचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय मूल येथे घेवुन आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत ठवरे करीत आहेत.