Click Here...👇👇👇

शाळेकडून पालकांना टिसी घेऊन जाण्याची धमकी. #Threat

Bhairav Diwase
15 ऑगष्ट पासुन साखळी उपोषणाचा इशारा.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल: वाढविलेली शिक्षण शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी खाजगी शाळा पालक संघर्ष समितीने अनेकदा निवेदने देवून प्रशासनाचे लक्ष वेधले, यामुळे शाळेनी ठरविलेली शिक्षण शुल्क भरा अन्यथा शाळेतुन टिसी घेऊन जाण्याची धमकी शाळेकडून दिली जात आहेे. सदर धमकीमुळे पालकवर्गामध्ये तिव्र असंतोष पसरलेला असुन स्वातंत्र्यदिना पासुन समितीच्या वतिने शाळेच्या समोर साखळी उपोषणाला बसण्याची तयारी केल्या जात आहे.
कोरोना काळाती शिक्षण फि वाढवु नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहे, त्यासोबत पुस्तक, नोटबुक, डेªस घेण्याची शक्ती करून नये असेही आदेशात म्हटले आहे, परंतु मूल येथील काही शाळेनी कोरोना काळातही मोठया प्रमाणात शिक्षण शुल्क वाढविलेली आहे. याबाबत खाजगी शाळा पालक संघर्ष समितीने निवेदनाव्दारे वाढविलेली शिक्षण शुल्क कमी करण्याची मागणी रेटुन धरली, मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मूल येथील सर्व खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेवून शिक्षणाधिकारी, चंद्रपूर यांच्या 19 एप्रिल 2021 च्या पत्राचे काटेकोरपणे पालण करण्याचे आदेश दिले, यावेळी शाळेनी शिक्षण शुल्क वाढविलेली नसल्याचे सांगीतले, मात्र प्रत्यक्षात शिक्षण शुल्कांमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे.
वाढविलेली शिक्षण शुल्क कमी करण्याची मागणी खाजगी शाळा पालक संघर्ष समितीने केली असता, तुम्ही टिसी काढुन घेवून जा, मात्र आम्ही शिक्षण शुल्क कमी करणार नाही असा हेका शाळेकडून धरला जात आहे. कोरोना काळात शिक्षण शुल्काबाबत अशी धमकी देता येत नाही, यामुळे शाळेवर कारवाई करण्यात यावी व वाढविलेली शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे अन्यथा 15 आॅगष्ट पासुन साखळी उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा पालक संघर्ष समितीचे प्रशांत समर्थ, किशोर कापगते, संजय भुसारी, गिरीष कांचनकर, अॅड. ब्रम्हआझाद नागोशे, विवेक मुत्यालवार, राकेश ठाकरे, अजय गड्डमवार, संजय खोब्रागडे, मंगेश पोटवार, गौतम जिवणे, शैलेष वनकर, भोजराज गोवर्धन, महेश जेंगठे यासह पालकांनी दिला आहे. #Threat