महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटकूळ या शाळेतील सात विद्यार्थी NMMS च्या गुणवत्ता यादीत. #NMMS #Pombhurna


पोंभुर्णा:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2020-21 ची अंतिम गुणवत्ता यादी काल दिनांक 18 ऑगस्ट ला प्रसिद्ध झाली. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटकूळ पंचायत समिति पोंभूर्णा येथील इयत्ता 8 वी मधील नऊ विद्यार्थी पास झाले व सात विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले. शेजल गणपती पाल, दिक्षा नानाजी गेडाम, साक्षी सागर देशमुख, रूतुजा चंद्रशेखर बोरकूटे, श्वेता साईनाथ बोरेकर, लक्ष्मी रविंद्र देऊरघरे, आर्या उत्तम देशमुख या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. #Pombhurna

विशेष म्हणजे या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेला विद्यार्थ्यांना बसण्याची संधी देण्याचे हे शाळेचे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी एक विद्यार्थीनी तनुजा संदिप गोडबोले ही शिष्यवृत्ती साठी निवड झाली असून तीला 12000/- रू. मागील वर्षीचे मिळालेले आहेत. या वर्षी शाळेतील नऊ विद्यार्थी परीक्षेत पास झाले होते त्यापैकी सात विद्यार्थी पात्र ठरले आणि सलग दुसऱ्या वर्षीही शाळेचा यशोदिप अखंड तेवत ठेवला आहे. या सातही विद्यार्थ्यांना दरवर्षी रू. 12000/- प्रमाणे पाच वर्ष शिष्यवृत्ति मिळणार आहे. #Adharnewsnetwork

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. निमसरकार सर व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले असून पालकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत