चेक आष्टा शाळेतील सहा विद्यार्थी "एनएमएमएस"च्या गुणवत्ता यादीत. #Pombhurna #NMMS

Bhairav Diwase
0

पोंभुर्णा:- आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकरडून स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपचं नाव नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप National Means-cum-Merit Scholarship (NMMS) आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मदत केली जाते. नुकताच केंद्र शासनामार्फत इयत्ता 8 वीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात येत असलेल्या परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून पंचायत समिती पोंभुर्णामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेऊन यश मिळविले आहे. #Pombhurna
या परिक्षेला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेतील इयत्ता 8 वीच्या एकूण 20 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी 7 विद्यार्थी या परिक्षेत पास झाले असून 6 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले. आयुष्य दिलीप येरमे, नोकेश अर्जुन मरस्कोल्हे, युवराज रमेश रासपल्लीवार, रंजन संदिप मडावी, सुमित रामदास तोडासे, भाग्यश्री दामोधर येरमे हे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले. तसेच या परीक्षेसाठी मार्गदर्शन श्री सतिश शिंगाडे सर यांनी केले.
शिष्यवृत्तीत पात्र ठरले या 6 विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून, बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक अरूण यामावार व सर्व शिक्षकवृंदांनी कौतुक केले आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील N M M S परीक्षेत पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा या शाळेतील 7 विद्यार्थी पास झालेले आहेत. त्यापैकी 6 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेली आहेत. त्या सर्व पात्र विद्यार्थी तथा मार्गदर्शक शिक्षकांचे माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांच्या कडून हार्दिक अभिनंदन..! या पुढे शिक्षणामध्ये प्रगती कायम ठेवावी..💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)