Top News

वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट ठार. #Death


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भद्रावती तालुक्यातील टाकळी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार होण्याच्या घटनेची शाही वाळत नाही तोच वाघांच्या झुंजीत बिबट ठार होण्याची घटना घडल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे. #Death

प्राप्त माहितीनुसार, येथील आयुध निर्माणीच्या वसाहतीत आज दि.१९ ऑगस्ट रोजी बिबट मृतावस्थेत आढळून आले. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर बिबट हा नर प्रकारचा असून ७ ते ८ वर्षे वयाचा आहे. पट्टेदार वाघासोबत झालेल्या झुंजीत तो ठार झाल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास भद्रावतीचे वन परिक्षेत्र अधिकारी शेंडे करीत आहे. #Adharnewsnetwork

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने