पोंभुर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथील घटना.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर टॉक येथे वैनगंगा नदीच्या पात्रातून नावे च्या साह्याने जात असताना नावेला झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण बचावले आहेत. ही घटना काल सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान घडली. #Disappeared
नेहमीप्रमाणे ये-जा करीत असताना हा दुर्दैवी अपघात होऊन एका नवनीत पाहुण्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे गंगापूर आणि परिसरातील गावात खळबळ माजली आहे. दशरथ भाऊजी भलवे वय 24 वर्षे राहणार किस्तापुर, तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे या दुर्दैवी घटनेत बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. हे पुरुषोत्तम देविदास शिंदे वय 27 वर्ष राहणार गंगापूर तहसील पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर, रुपेश गडदे राहणार गणपुर, तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे या दुर्घटनेतून बचावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. #Adharnewsnetwork
घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी व त्यांच्या टीमने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असून NDRF च्या तुकडीला पाचारण करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक बोट च्या माध्यमातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. वृत्त लि पर्यंत शोधमोहीम सुरू होती. बेपत्ता व्यक्तीचा तपास लागला नव्हता. घटनास्थळावर पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी हे उपस्थित असून शोध कार्यास मदत करीत आहेत. #Pombhurna