निव्वळ भाजपाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र:- उपमहापौर राहुल पावडे. #Rahulpawade #DeputyMayor #Bjp #Chandrapur

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मनपाच्या आमसभेत (29जुलै) ला सर्व प्रथम काँग्रेस व मनसे च्या नगरसेवकांनी धुडघुस घातला. महापौरांच्या समोर येऊन टेबल ठोकण्याचा प्रकार झाला. महापौर महिला आहेत. याचेही भान त्यांना राहिले नाही.आयुक्तांनी व इतरांनी समजवल्यावर शांतीने विषय मांडता आला असता. पण त्यांना ते करायचेच नव्हते. सगळं काही पूर्वग्रहदूषितच होते. #Rahulpawade #DeputyMayor #Bjp #Chandrapur
आभासी सभा असतांना नगर सेवकांनी सभागृहात उपस्थित होणे,क्रमप्राप्त नव्हते. बॅनर वगैरे घेऊन घोषणाबाजी झाली, म्हणजे हे पूर्व नियोजित होते. याची पुसटशी कल्पना मनपा प्रशासन किंवा पदाधिकाऱ्यांना नव्हती. त्यांच्या अनाप-शनाप आरोप व महापौरांसमोर येऊन शिवीगाळ करीत बोलणे व टेबल ठोकणे, ही हिंसा आहे. लोकांनी समस्या सोडविण्यासाठी निवडून दिले. धिंगाणा घालायला नाही. हे ते विसरले, या प्रकाराने सर्व स्तब्ध झाले. विरोधीकांनी सीमा ओलांडली. लोकशाहीत हा प्रकार योग्य नाही. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास सगळे तयार असतांना केवळ प्रसिद्धी माध्यमात झळकण्यासाठी ही खटाटोप आहे.
काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये पीछेहाट होत आहे.त्यांच्या काळातील प्रचंड भ्रष्टाचार जनतेनी भाजपला एकहाती सत्ता देऊन संपविला. आता सर्व इ टेंडरने होते. त्यामुळे काँग्रेसची कमिशनखोरी, भागीदारी संपुष्टात आली. पुढे निवडणुका आहेत, त्याला समोर ठेवून दादागिरी केली जात आहे. अश्या प्रकारामुळे माणूस प्रसिध्दीझोतात येतो, पण जनतेला हे चेहरे माहीत आहेत. जनता यांना नक्कीच धडा शिकवेल. पप्पू देशमुखांचा आरोप फक्त भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर आहे. गदारोळ तर काँग्रेस व मनसेने घातला. त्यांच्या दुष्कृत्याचा साधा उल्लेख व निषेध देशमुखांनी केला नाही. यावरूनच हे सर्व सुनियोजित होते. हेच दिसून येते. भाजपाला बदनाम करण्याचा हे षडयंत्रच आहे. असे मनपा उपमहापौर राहुल पावडे यांनी म्हटले आहे.
पप्पू देशमुख हे देखील यात सहभागी आहेत. हल्ली ते काँग्रेसचे वकील पत्र घेतल्या सारखं बोलतात, आणि आरोप करीत सुटतात व प्रसिद्धी झोतात येतात.त्यांनी खोटे आरोप केले आहे. त्या विरुद्ध दावा ठोकू. आज पर्यंत एक ही आरोप सिद्ध झाला नाही.आरोप करायला काही लागत नाही. सर्वात सोपे हे काम असल्याने देशमुखांनी हा मार्ग स्विकारला आहे.