जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ग्रामीण भागातील मानविकास अंतर्गत बस शालेय वेळेवर सुरु करा, राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी. #Saoli #saolinews


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सध्या लाॅकडाउन असल्यामुळे सावली तालुक्यातील बस सेवा पुर्णता बंद आहे त्याचा फटका ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी यांना बसत आहे. सावली तालुक्यातील वर्ग ८ ते १२वी पर्यन्त शाळा सुरु झाले असल्याने ग्रामीन भागातील शालेय विद्यार्थी सावली तालुक्याच्या ठिकाणी शाळेच्या वेळेवर ये जा करावे लागते‌. #Saoli #saolinews
तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कामा करीता, शेती निविष्ठा खरेदी, आरोग्या करिता दवाखाना तसेच शेतमाल व धान्य विक्री, विविध कामा करीता तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. बस सेवा बंद असल्यामुळे सदर बाबीचा फटका विद्यार्थी व शेतकरी शेतमजुरास,सामान्य नागरिकास बसत आहे, कारण सामान्य माणसाजवळ स्वतःचे वाहन नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे दोन चाकी वाहनानि जाने-येणे करू शकत नाही. #Adharnewsnetwork
 
      करीता एस.टी. महामंडळा मार्फत मुल सावली ते हरांबा उपरी मार्ग व कवठी चामोर्शी गडचिरोली केरोडा चांदली, याप्रमाणे शालेय वेळेवर  बस सेवा तातडीने सुरू करावि अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य  तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत