युवा वारियर्स अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी मिथिलेश पांडे यांची नियुक्ती. #Selection(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने युवा वारियर्स अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र नवीन युवकांना पक्षाशी जोडायला सुरवात करण्यात आलेली आहे.#Adharnewsnetwork
या पाश्र्वभूमीवर भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. मिथिलेश पांडे यांची युवा वारियर्स अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, चंदनसिंहजी चंदेल, हरीशजी शर्मा, अजयजी दुबे, सतविंदर सिंहजी दारी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्काताई आत्राम व भाजपाच्या सर्व आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिथिलेश पांडे यांचे अभिनंदन केले.
यासोबतच येणाऱ्या काळात आपल्या नेतृत्वाखाली या अभियानांतर्गत जिल्ह्यातील युवावर्ग मोठ्या संख्येने पक्षसंघटनेत सहभागी होऊन सक्रिय होईल, तसेच भाजपचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपणाकडून यशस्वी प्रयत्न होतील. असा आम्हाला विश्वास आहे. असा आशावाद यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी व्यक्त केला.#Selection

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या