Click Here...👇👇👇

अडेगाव-खडकी रस्ता सिमेंट कॉंक्रेटिकरण करने व ओव्हरलोड वाहतूक बंद करून इतर मागण्यासाठी बेमुद्दत अनोखे खड्यात उपोषण. #Yavatmal

Bhairav Diwase
अडेगाव येथील युवकांचे अनोखे बेमुदत खड्यात बसून उपोषण सुरू


यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव - खडकी - गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी आहे. या खदानीच्या मोठ्या वाहतूकी ही खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याणी चालत असतात.#Adharnewsnetwork
     
     या परिसरात जगती मिनरल्स, ईशान मिनरल्स, सूर्या मिनरल्स , गुंडावार मिनरल्स, मोनेट इसपात व इतर गिट्टी खदानीचे मोठी वाहतूक ही अडेगाव रस्त्याणी जाते , मात्र या रस्त्याची मर्यादा फक्त "दहा टनची" असताना या रस्त्यावरून खदानी चे मोठी जड वाहतूक होते. यामुळे अडेगाव - खडकी रस्ता संपूर्ण खराब झाला असून प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासन या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे . या परिसरातील जड वाहतूकीमुळे संपूर्ण कंपनीने रस्ता पूर्णतः खराब केला आहे , तरी अनेकवेळा रस्त्याची मागण्या करून सुद्धा रस्ता न झाल्याने अडेगाव येथील युवा नेतृव मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली पासून खडकी बस स्थानकाच्या बाजूला अनोखे खड्यात उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणामध्ये अडेगाव - खडकी रस्ता काँक्रेटिकरं झाला पाहिजे, रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी, रस्त्यावरील तुटलेले पूल नवीन बांधण्यात यावे, मोठी वाहतूक ही सायं.०६ च्या नंतर सुरू करण्यात यावी ,संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे अश्या विविध मागण्या उपोषणामध्ये आहे. 
उपोषण हे अनोखे असल्याचे मंगेश पाचभाई यांनी बोलून दाखवले की, या उपोषणात दुसऱ्या दिवशी जिल्हा अधिकारी याना रक्ताने पत्र, तिसरा दिवशी मुडन, चोथा दिवशी रास्ता रोको असे अनेक मुद्धे असून उपोषण आक्रमक होण्यार असल्याची चर्चा परिसरात आहे. प्रशासन या कडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . या उपोषणात अडेगाव येथील राहुल ठाकूर , दत्ता लालसरे, गिरीधर राऊत , दिनेश जीवतोडे, निखिल देठे, दत्ता भोयर यांच्यासोबत समस्त गावकरी पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. #Yavatmal