बोरगाव येथील महिलेवर प्राणघातक हल्ला. #Attack

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महिलांवरील अन्याय अत्याचार अधिक जोमाने डोके वर काढत असून कायद्याची भीती राहिलेली दिसत नसून गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे नव्हे संपूर्ण देशभर हीच परिस्थिती आहे. #Attack
गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील दर्शना झाडे वय 55 वर्ष या महिलेवर संघमित्रा फुलझेले वय 35 वर्ष या युवकाने भर दिवसा धारदार शस्त्राने हल्ला चढविला. #Adharnewsnetwork
     
          पीडित महिला व आरोपी युवक हे एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत त्यामुळे जुन्या घरगुती वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. महिलेच्या कानाला आणि हाताला गंभीर मार असून तिचे वर गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना होताच घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत