तळ्याच्या पारीवर फुलली विविध वृक्षाची बाग. #Pombhurna #Sonapur

Bhairav Diwase

रोजगार हमी योजनेअंतर्गत झाले काम.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत मामा तलावाच्या काठावर विविध वृक्षाची लागवड करून वृक्षाचे बन फुलले आहे. #Pombhurna #Sonapur

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर गावात मामा तलावाच्या काठावर ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत विविध वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. २०१९-२० या वर्षी लावण्यात आलेले विविध जातीचे ४०० वृक्ष आजमितीस पुर्णपणे जीवंत असून.रोजगार सेवक व दोन महिला कामगार वृक्ष संगोपन करित आहेत. आजमितीस दोन वर्षांच्या वृक्ष संवर्धनातील वृक्ष १५ फुटापर्यंत वाढलेली आहेत. #Adharnewsnetwork

तळ्याच्या पारीवर तलावाची गाळ टाकली असल्याने वृक्ष वाढ झपाट्याने होत आहे. तालुक्यात या वृक्ष संगोपनाची चर्चा असून अनेक लोकं या कामाला भेट देत आहेत.
कामाचे नियोजन व वृक्ष संवर्धनाचे काम पाहण्यासाठी तहसिलदार डॉ. निलेश खटके, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोले, रोजगार हमीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हेमंत येरमे, तांत्रीक सहाय्यक सतीश वाढई यांनी भेट दिली. यावेळी आष्टा ग्रामपंचायतच्या सरपंचा किरणताई डाखरे, रोजगार सेवक सुरेश दिवसे उपस्थित होते.