चंद्रपुरात किराणा व्यवसायिकाकडे आढळला देशी कट्टा. #Chandrapur #Gun

Bhairav Diwase

5 जिवंत काडतुसासह 10 हजारांचा मुद्देमाल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटल्यावर गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत आहे, चंद्रपूर व बल्लारपूर शहरात गॅंगवार च्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. #Chandrapur #Gun
गुन्हेगारीच्या घटनेत होणारी वाढ बघता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यात देशी-विदेशी कट्टे वापरणाऱ्यांची माहिती गोळा करून त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार केले. #Adharnewsnetwork
2 सप्टेंबर ला स्थानिक गुन्हे शाखेला लखमापूर येथील छत्तीसगडी मोहल्ल्यात एका व्यक्तीजवळ अवैध देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे लखमापूर येथील किराणा दुकान व्यवसायिक 52 वर्षीय रुकधन परसराम साहू यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारीत एक देशी बनावटीचे लॉंग बॅरेल पिस्टल व 5 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले.
देशी कट्टा वापरणाऱ्या साहू यांचेवर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली, सदरची कारवाई स.पो.नि. बोबडे, पो.उप.नि. संदीप कापडे, पो.हवा . संजय आतकुलवार, पो.शि. गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी यांनी केली आहे.