Top News

गस्तीवर असलेल्या वनमजुरावर वाघाचं हल्ला. #Attack

वनमजुर गंभीर जखमी.

सावली:- सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गेवरा बीटा मध्ये सद्या वाघाने चांगलाच धुमाकूळ सुरू केलेला असून काल जनावरांच्या कळपावर तर आज दिनांक 26 ला वाघाच्या बंदोबस्त असलेल्या वनमजुरावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना दुपारी 3 च्या सुमारास घडलेली आहे.
वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वत्र होत असताना सावली वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी हे स्वता: लक्ष घालून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून वनमजुर लावून काही नागरिकासोबत सुरक्षा करीत आहे. आज दिनांक 26 ला दुपारी करोली रोड वर असलेला कचरा साप करण्यासाठी काही मजूर लावले तसेच त्यांना वाघापासून सुरक्षा मिळावी म्हणून 3 वनमजुर गस्त करीत असतानाच दडून बसलेल्या वाघाने कृष्णा डंबाजी बानबले वय 39 वर्ष रा. गेवरा खुर्द याच्यावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. सोबतीची सहकार्याने त्या वाघाला पिटाळून लावल्याने तो जंगलात गेला. 
सदर घटना ही कक्ष क्रमांक 153 मध्ये घडली असून माहिती मिळताच वनरक्षक श्रीराम आदे यांनी या बाबत वरिष्ठांना माहिती दिली. व सर्वप्रथम त्या जखमी वनमजुर ला अंतरगाव येथील प्राथमिक स्वास्थ केंद्र मध्ये नेले व त्या नंतर त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. या घटनेमुळे सर्वत्र वाघाची दहशत पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने