🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अतुल अल्याडवार यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार. #Award

पोंभूर्णा:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या वतीने देण्यात येणारा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा येथील मुख्य लिपिक अतुल अल्याडवार यांना नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
अतुल अल्याडवार यांना उत्कृष्टतेसाठी देण्यात येणारा पुरस्कार त्यांच्या कार्यालयीन कामकाज, सामाजिक कार्य, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची दखल घेत विद्यापीठानी त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या वर्धापनदिना निमित्य गडचिरोली येथे दिनांक २ ऑक्टोबरच्या होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पुरस्कार निवडीकरीता चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी दोंतुलवार, सचिव स्वप्नील दोंतुलवार, चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एच.पठाण, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा संस्थेचे सदस्य प्राचार्य प्रशांत दोंतूलवार, चिंतामणी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत