Top News

उद्या कवी धनंजय साळवे यांच्या 'अजून मी हरलो नाही' व कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या 'मी मनमोर' कवितासंग्रहाचे प्रकाशन. #Chandrapur

फिनिक्स साहित्य मंचाचे आयोजन; परिसंवाद व पुरस्कार वितरण सोहळा
चंद्रपूर:- जिल्ह्यात प्रयोगशिल प्रशासकिय अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले प्रसिद्ध कवी धनंजय साळवे यांच्या 'अजून मी हरलो नाही' व प्रसिद्ध कवी व निवेदक नरेशकुमार बोरीकर यांच्या 'मी मनमोर' या कवितासंग्रहाचे प्रकाशन उद्या (दि.२ आक्टो) चंद्रपूर येथील पंचायत समीती सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित कवितासंग्रह प्रकाशन, परिसंवाद व पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे कवी सुधाकर कन्नाके राहतील. उद्घाटन गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे करतील. कवितासंग्रहावर भाष्य नागपूरचे प्रसिद्ध कवी, समीक्षक प्रसेनजीत गायकवाड व युवा कवी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर करतील. विशेष अतिथी म्हणून गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ उपस्थित राहतील‌ 'आजची कविता वर्तमानाचे आव्हाने पेलण्यास समर्थ आहे' या विषयावर आयोजित परिसंवादात प्रसिद्ध समीक्षक डॉ.श्याम मोहरकर, प्रसिद्ध कवी व वक्ते डॉ.धनराज खानोरकर विचार व्यक्त करतील.
यंदाचे फिनिक्स साहित्य मंचाचे साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वार्षिक पुरस्कार गोपाल शिरपूरकर, नितीन जुलमे, प्रब्रम्हानंद मडावी, सुनिल पोटे, राजेंद्र परतेकी, हरिश ससनकर, ललीत चिकाटे, मीना बंडावार यांना प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन फिनिक्स साहित्य मंचातर्फे संयोजक विजय वाटेकर, बी.सी.नगराळे, सुरेंद्र इंगळे, ईश्र्वर टापरे, अरुण घोरपडे, जयवंत वानखेडे, धर्मेंद्र कन्नाके, सुनिल बावणे, दुशांत निमकर, संभा गावंडे, राजेंद्र घोटकर, पंडीत लोंढे, चंद्रशेखर कानकाटे, नरेंद्र कन्नाके, वैशाली दिक्षीत, शितल धर्मपुरीवार, संतोषकुमार उईके, मिलेश साकुरकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने