🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सोयाबीन तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटला. #Accident

एका महिला ठार, १० जण जखमी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सोयाबीन तोडणी करीता जात असताना सोयाबीन तोडणी मजुरांचा टेम्पो पलटी होवून त्या मध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
सदर टेम्पो चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या महाकाली नगरजवळ रात्रीच्या सुमारास उलटला असून त्यामध्ये एक महिला मजूर ठार झाली आहे तर अन्य १० मजूर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले तर अन्य ४ गंभीर जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णलयात भरती केले आहे. किरकोळ जखमींवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लताबाई टिकाराम थोरात (५५) उपरी असे मृतक महिलेचे नाव आहे. तर पुरुषोत्तम बोदलकर वय ५० संगीता रोहनकर वय ४० जनार्धन कुकडकर वय ५०, सुरज थोरात वय २२ वर्ष हे गडचिरोली येथे दाखल आहेत. उषा सातपुते वय ४०, रोशन कोठारे वय ३०, नीलिमा कोठारे वय २७, ललिता कोटगले वय ४० यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत