🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गरोदर महिलेला घेऊन निघालेल्या अँबुलन्स व मेटॅडोर मध्ये जोरदार धडक. #Accident

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना.
कोरपना:- गडचांदूर राजूरा रोड वरील हरदोना खुर्द बस स्टँड जवळ अंबुजा फाटाच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या एका मेटाडोरने गडचांदूरच्या दिशेने येणार्‍या एम्बुलेंसला जोरदार धडक दिली.ही घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री अंदाजे ९ च्या सुमारास घडली असून धडक एवढी जबरदस्त होती की एम्बुलेंस व मेटाडोरचे कैबीन चक्काचूर झाले.
ही दोन्ही वाहने समोरा समोर धडकल्याने एम्बुलेंस रोडच्या बाजुला फेकली गेली. एम्बुलेंस चालक रक्तबंबाळ अवस्थेत सिटवर अडकून पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हरदोना खुर्द येथील तरूण व इतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने एम्बुलेंस मधील गंभीर जखमी व मेटाडोरच्या चालकाला गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले.
सदर एम्बुलेंस गडचांदूर वरून एका गरोदर महिलेला घेऊन चंद्रपूर येथे जात होती. अशी माहिती असून एम्बुलेंस मध्ये महिले सोबत तीन जण असल्याची माहिती उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सदर प्रतिनिधींना दिली असून या घटनेत किती लोकांची जीवीत हानी झाली याची माहिती बातमी लिहिस्तोवर मिळालेली नव्हती.
ठाणेदार सत्यजीत आमले,सपोनी प्रमोद शिंदे,सफो शकील अंसारी,पोना धर्मराज मुंडे, वाहतुक पोलीस तीवारी व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अंबुजा फाटा ते हरदोना खुर्द पर्यंत रोडच्या दोन्ही बाजूंनी विविध ट्रांस्पोर्टच्या वाहनांची रांग लागून असते,अनेकदा तक्रारी करण्यात आल्या.काही दिवस ही वाहने रोडच्या बाजुला दिसत नाही. नंतर परिस्थिती जैसे थेच असते.या वाहनांचा कायमस्वरूपी तोडगा काढावा अशे सुर घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून पोलीसांसमोर उमटताना दिसत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत