शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या कृषीमंत्र्यांकडे मागणी. #Shivsena #Pombhurna

Bhairav Diwase
शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांची मागणी.
पोंभूर्णा:- राज्यासह पोंभुर्णा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक पीकं पाण्याखाली आले आहे.यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात पोंभूर्णा तालुक्यात सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. सोयाबीनला कोंब फुटले, कापसाची बोंडे सडली, तुरीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केल्याने सोयाबीनला फक्त चार ते पाच हजाराचा भाव मिळत आहे. केंद्र सरकारने पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदना द्वारा करण्यात आली आहे.
दरम्यान अतिवृष्टीमुळे पोंभुर्णा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून पोंभूर्णा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच ओलादुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी.
आशिष कावटवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना तालुका प्रमुख पोंभूर्णा