🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा व रेड अलर्ट. #Chandrapur #Redalert #Rainचंद्रपूर:- भारतीय हवामान खाले (IMD) यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरीता करिता दिनांक 27 सप्टेंबर, 2021 या दिवसासाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, रेड अलर्ट देत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मुसळधार ते खुप मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे. तसेच जिल्हयातील धरणांची पातळी देखील भरपूर प्रमाणात वाढलेली असून त्यानुषंगाने नागरिकांनी विशेषःत शेतक-यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस व आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवकामुळे पुर परिस्थिती लक्षात घेता द्वारे असणारे मोठे धरणाचे वक्रव्दार (गेट) केव्हाही उघडण्यात येवू शकतात व द्वारे नसणारे धरणातील पाणी साठा 100% पेक्षा जास्त झाल्यावर नदी नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार असल्याकारणाने नदी काठावरील सर्व नागरिकांनी / शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना व नदी पात्रातून आवागमण करणा-या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरण बाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेऊन सतर्क रहावे.

कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका.

नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा.

मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका, नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.

अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.

धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणा-या ठिकाणी थांबू नका.

घडलेल्या घटनेची आपत्ती ची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी.

चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर,नियंत्रण कक्ष क्र. 07172-251597 तरी सर्व जनतेनी सहकार्य व सतर्क राहावे ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत