Click Here...👇👇👇

केंद्रिय कोळसा व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लवकरचं चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा. #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा अध्यक्ष, विधिमंडळ लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार केंद्रीय कोळसा व रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे हे चंद्रपूर जिल्हयाच्या दौऱ्यावर लवकरच येत आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. या दौऱ्यात ते चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीच्या परिसरातील नागरिकांच्या तथा कामगारांच्या विविध समस्या, व तक्रारी जाणुन घेणार आहेत.

रेल्वे संबंधी समस्या व तक्रारीसुद्धा यावेळी समजून घेऊन निराकरण करण्यात येणार आहेत. करिता आपल्या क्षेत्रातील कोळसा खाणीसंदर्भात किंवा रेल्वेसंदर्भात काही तक्रारी किंवा समस्या असल्यास या दौऱ्याचे संयोजक भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या व्हॉट्सॲ क्रमांक 9822299011 वर 5 ऑक्टोबर पर्यंत पाठवा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.