Top News

कर्तृत्वशून्य स्वाभिमानी घोडा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन. #Publications



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- कवी देवेंद्र मनगटे यांचा आकांक्षा प्रकाशन, नागपूर तर्फे प्रकाशित 'कर्तृत्वशून्य स्वाभिमानी घोडा' या कवितासंग्रहाचे विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात कविवर्य श्री. बबन सराडकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याला प्रा.श्रीकांत पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी कवितासंग्रहावर प्रसिद्ध समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी भाष्य केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रवीण सोनटक्के यांनी व्यक्त केले.#Adharnewsnetwork


"काही नवीन सांगून पाहणारी कवी देवेंद्र मनगटे यांची ही कविता वाचण्याऐवजी शांतचित्ताने ऐकावी अशी वाटते. अपूर्णत्वच्या जाणिवेतूनच हा कवी अपूर्णत्वाचा शोध घेत जातो. सर्वसामान्यांना आपलीशी वाटणारी व समाज चिंतन करणारी ही कविता आहे" असे मत अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले आणि कवीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कवितासंग्रहावर भाष्य करताना डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी "कविता हा आत्मशोधाचा प्रवास असतो. कवीचं व्यष्टी समष्टीशी नातं असतं. ह्या कवितेत आत्मस्वर प्रभावीपणे व्यक्त झालेला आहे. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी ही कविता समाजाचं वास्तव चित्रण करते" असे आपले मत मांडले.
🟥
कविवर्य श्री बबन सराडकर यांनी कवितासंग्रहाचे प्रकाशन करते वेळी "हा कवी आणि कविता हे दोघेही वेगळे नाहीत. त्याच्या खडतर जगण्यानेच त्याला ही कविता दिली. त्याच्या भावनांचा निचोड म्हणजेच त्याची ही कविता आहे. या कवितासंग्रहाच्या निमीत्ताने कवीच्या कर्तृत्वाचा झेंडा सर्वदूर फडकेल व हा 'कर्तृत्वशून्य स्वाभिमानी घोडा' एक दिवस कर्तुत्ववान ठरेल अशी आशा  व्यक्त केली. आणि कवीच्या आयुष्यातील काट्यांची फुले होवोत अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. 
प्रास्ताविकपर भाषणात डॉ. सुधीर मोते यांनी भविष्यात हा कवितासंग्रह 'लंबी रेस का घोडा' ठरेल असे आपले मत व्यक्त केले.  कवी देवेंद्र मनगटे यांनी मनोगतात आपला आजवरचा काव्यप्रवास आणि कवितासंग्रहाच्या शीर्षकाचा उलगडा केला.#Publications
😁

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने