पोंभुर्णा तालुका व शहर काँग्रेस कमेटी च्या वतीने सोमवारी पोंभुर्णा तालुका बंदचे आवाहन. #Close #Congress #Appeal

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पारीत करुन देशाच्या शेतकर्‍यांना देशोधडीला लावले आहे याविरोधात शेतकर्‍यांच्या वतीने संपूर्ण भारतात उद्या दिनांक २७सप्टेंबर रोजी (सोमवारी) भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंद ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा जाहीर पाठिंबा असून पोंभुर्णा शहर व ग़ामीण कळकळीत बंद ठेवण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.
तालुका काँग्रेस कमटीचे अध्यक्ष कवडू कुंदावार यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारला पोंभुर्णा बंद ठेवून नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी, नागरिकांनी सोमवारी सकाळी आठ वाजता काँग्रेस कार्यालयात उपस्थित राहून भारत बंद यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते अतिक कुरेशी,शहर काँग्रेस अध्यक्ष दत्तु येल्लूरवार , सचिव जयंत टेकाम , उपाध्यक्ष अमोल देवतळे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष साईनाथ शिंदे, उपाध्यक्ष रुषी पोल्लेलवार , उपाध्यक्ष रवि मरपल्लीवार , सचिव सोमेश्वर कुंदोजवार , विनोद थेरे, हेमंत आरेकर, राजाराम मोहुर्ले, विनायक बुरांडे, यांनी केले आहे.