जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जामखुर्द हद्दीत अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह. #Death

सदर व्यक्तीची ओळख पटली तर त्यांनी पोंभूर्णा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- पोंभूर्णा :- तालुक्यातील  जामखुर्द बस स्टॅण्ड नजीक मुल - पोंभूर्णा मुख्य मार्गाच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदर व्यक्तीची ओळख पटली नसून पोंभूर्णा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
 आज सकाळी दि.१८ सप्टेंबर ला  ६ वाजताच्या दरम्यान जामखुर्द येथील रोजच्या प्रमाणे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या युवकांना रस्त्याच्या कडेला एक इसम मृत अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी जामखुर्दचे सरपंच व पोंभूर्णा पोलिस स्टेशन यांना माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित मृतकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले मात्र अजून पर्यंत मृतकाची ओळख पटली नाही. 
     पोंभूर्णा पोलिस ठाण्यात सदर  घटनेचे मर्ग दाखल करण्यात आक्समिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा  प्राथमिक तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दादाजी ओल्लालवार करीत आहेत.
   सदर मृतकाचा घातपात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत