जाहिरात... Advertisement... विज्ञापन

प्राथमिक शाळा सुरु करा, शिक्षक परिषदेची मागणी. #Pombhurna


गटशिक्षणाधिकारी पोंभुर्णा यांना निवेदन देतांना म.रा.शि.प.प्राथमिक तालुका कार्यवाह अरुण यामावार.

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- कोविड नियमाचे पालन करुन प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा पोंभूर्णा च्या वतीने मा. तहसिलदार पोंभूर्णा , गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी पोंभूर्णा यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे केली.
निवेदनात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोविड नियमाचे पालन करुन प्राथमिक शाळा सुरु कराव्या. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक पोंभूर्णा तालुका शाखा अध्यक्ष बंडूजी गायगोले, तालुका कार्यवाह अरुण यामावार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत