(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:-:सावली तालुक्यातील मंगरमेंढा येथील प्रशांत दुमाजी मेश्राम वय 20 वर्ष हे दि. ७/९/२०२१ सकाळी सुमारे ११ वाजता पासुन पाथरी- भानापुर ते मंगरमेंढा या मार्गावरून बेपत्ता झाल्याची माहिती सर्वत्र देण्यात आलेली होती. #Death
तसेच पाथरी पोलिसांना ही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे प्रशांत चा सर्वत्र शोध सुरू असतानाच आज दिनांक 9 ला सकाळी मेहा ते उसरपार तुकुम झिरो गेट जवळ जवळ जीन्स- लाल-गुलाबी शर्ट घातलेला असलेला मृतदेह असल्याची याची माहिती परीवार ला मिळताच त्यानीं घटना स्थळी बघता तो मृतदेह प्रशांत चा असल्याचे स्पष्ट झाले.
या संदर्भात पाथरी पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आलेली असून पोलीस पंचनामा करून पुढील तपास करणार आहे.मात्र प्रशांत चा मृत्यू कसा झाला हे मात्र गुलदस्त्यात असून पोलीस याचा तपासात उलगडा करणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत