(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- दीर-भावजयच्या नात्यात प्रेमाचे नाते जुळले मात्र, हे नाते समाज मान्य करत नसल्याचे पाहून त्या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव नजीकच्या पैनगंगा नदीमध्ये आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. #Love #Suicide
💥पैनगंगेच्या पुलावरून युवक, युवतीने घेतली नदीत उडी.
👇👇👇👇👇👇
वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील हेमंत राजेंद्र चिंचोळकर असे दीराचे तर सोनाली असे त्याच्या भावजयीचे नाव आहे. हेमंत अविवाहित आहे. तर सोनालीला दोन मुली आहेत. दोघांमध्ये प्रेम जुळले. पुढील आयुष्य आता दोघांनी एकत्रितपणे घालविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महिनाभरापूर्वी दोघेही घरून निघून गेले होते. मात्र त्या दोघांना त्यांच्या नात्यातील दीर-भावजयीच्या नात्याची आठवण करून देण्यात आली व परत आणण्यात आले.
#Adharnewsnetwork
तथापि फार काळ ते वेगळे राहू शकले नाही. अखेर काही दिवसांनी त्या दोघांनी घर सोडले. सोनालीचे माहेर भद्रावती तालुक्यातील असल्याने २ ऑगस्टला ती बेपत्ता झाल्याची तक्रार भद्रावती पोलिसांत देण्यात आली तर हेमंत बेपत्ता झाल्याची तक्रार वरोरा तालुक्यातील शेगाव पोलिसांत देण्यात आली. अशातच या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव नजीकच्या पैनगंगा नदीमध्ये आत्महत्या केली. पुलावर हेमंत व सोनालीचे आधारकार्ड, पर्स व चप्पल आढळली. यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. याबाबत महागाव पोलिसांनी याची माहिती शेगाव पोलीस स्टेशनला दिली. अशाप्रकारे दीर-भावजयीच्या प्रेमाचा अंत झाला.