गोंडपिपरी:- वढोली गोंडपिपरी मार्ग खड्डेमय झाला असून सहा किलोमीटर च्या प्रवासात एक दोन नाही तर तब्बल पन्नासहुन अधिक खड्डे पडले आहेत त्यामुडे जिव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागते.बांधकाम विभागाचे अधिकारी झोपले आहेत काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.गोंडपिपरी ते खेडी रोड चे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. #Gondpipari
अनेकठिकाणी एकाबाजूला अर्धा भाग खोदकाम केल्यामुळे व रस्त्यावर गिट्टी पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे.रस्त्यावर मोठं मोठे खड्डे असून खड्यांचे रूपांतर डबक्यात झाले आहे.हे खड्डे आहेत की डबके असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. रस्त्यावर मोठं मोठी गिट्टी पसरली असल्याने.दररोज या मार्गावर अपघात घडत असून अनेकांना जिव गमवावा लागत आहे तर काहींना अपंगत्व येत आहे. वारंवार खड्डे भुजवण्याची मागणी करूनही नागरिकांच्या मागणीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने खड्यात फसतात मागील दोन वर्षापासून हा प्रकार वारंवार घडत असून या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व खेडी गोंडपीपरी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
गोंडपिपरी वढोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गीट्टी पसरून आहे. दुचाकी सह चारचाकी वाहन देखील चालवताणा मोठी कसरत करावी लागते. प्रवास सुरक्षित वाटत नाही. बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने खड्डे भुजवावे.
-डॉ.नितेश पावडे
-गोंडपीपरी