नाल्यात आढळला अज्ञात नवजात अर्भकाचा मृतदेह. #Death


अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्ह्याची नोंद;
संपूर्ण परिसरात खळबळ.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील ७ ते ८ किमी अंतरावर असलेल्या करणकोंडी या गावातील नाल्यात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना काल गुरुवार दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ ला उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. #Death
गावालगत असलेल्या नाल्यात नवजात अर्भकाचा मुतदेह आढळून आल्याचे गावातील बळीराम राठोड व श्रीपाद राठोड यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी तात्काळ जिवती येथील पोलीस स्टेशनला माहिती दिली.
माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन जिवती येथील मरापे मेजर व त्यांची चमू घटनास्थळी पोहोचून नाल्यामध्ये असलेल्या अज्ञात नवजात अर्भकाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाला ताब्यात घेतले.
परिसरात खळबळ उडल्यामुळे नवजात अर्भकाला नाल्यात टाकून देणारे माता पिता किती निर्दयी असतील ? का एका नवजात अर्भकाचा जीव घेतला ? असे का केले असेल ? असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहेत आणि अस्वस्थ करून टाकणारे आहेत.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सचिन जगताप पोलीस निरीक्षक जिवती व त्यांची चमू करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या