पत्रकारांची बदनामी करणे भोवणार. #journalist #Complaint

Bhairav Diwase
तालुका पत्रकार संघाची पोलिसात तक्रार; पत्रकार संघ आक्रमक.
गोंडपिपरी:- समाजमाध्यमातून पत्रकारांची बदनामी करणाऱ्या इसमाविरूध्द पत्रकार संघाने आक्रमक भुमिका घेतली आहे.सचिन चौधरी याच्या विरोधात संघाने रीतसर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.कठोर कार्यवाही करण्याची मागणी संघानी केली आहे.कार्यवाही न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा संघाने दिला आहे. #journalist #Complaint
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिल्या जाते. समाजातील घडणाऱ्या घडामोडी, नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासनकडे पोहोचवण्याचे काम पत्रकार करीत असतो. कोरोना काळात पत्रकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.कोरोनाची लागण होऊन अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला. शासन स्तरावर कुठलेही मानधन न घेता निःशुल्क सेवा देण्याचे काम पत्रकार करत आहे.मात्र काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकाकडून अलीकडे पत्रकारांवर हल्ले,धमकी येण्याचे प्रमाण वाढले आहे.अश्यात शुक्रवारला गोंडपिपरी येथील सचिन चौधरी याने गोंडपिपरी शेर या व्हाट्सअप ग्रुप वरती रात्री ०८:११ वाजता पत्रकारांना बदनामी करणारे लिखाण केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आकाश चौधरी यांनी वैफल्यातून काल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.त्यावर देखील त्याच्या मृत्यूला पत्रकार कारणीभूत आहेत असा बिनबुडाचा आरोप केला. या प्रकाराने समस्त पत्रकारांच्या भावना दुखावल्या.यापूर्वी देखील सोशल मीडियावर पत्रकार बद्दल अनेक आक्षेपार्ह विधान केले आहेत.  #Adharnewsnetwork सदर लिखाण करणारा हा गुंड प्रवृत्तीचा असून यापूर्वी गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. पत्रकारांवर बदनामीकारक लिखाण केल्या प्रकरणी सायबर गुन्हा अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी.अशी तक्रार गोंडपिपरी तालुका पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गोंडपिपरी यांच्यावतीने गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्याकडे तक्रार देण्यात आली.