Top News

जीव धोक्यात टाकून तालूका आरोग्य अधिकाऱ्याने केले गंगापूर गावचे शंभर टक्के लसीकरण. #Pombhurna #vaccination #Healthdepartment


दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून डोंग्याने करावा लागला प्रवास.

गावकऱ्यांनी आरोग्य यंत्रणेचे मानले आभार.

पोंभूर्णा तालुक्याचे ७० टक्के लसीकरण पुर्ण.
पोंभूर्णा:- कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग हादरुन गेले आहे. अशा या भयंकर महामारीच्या काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता, स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून, धाडसी साहस करत लसिकरणाचे कर्तव्य पार पाडत जनसेवेचा आदर्श घालून देणार्‍या पोंभूर्णा तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सर्वत्र कौतक होत आहे. #Pombhurna #vaccination 



पोंभूर्णा तालुक्याचे शेवटचे टोक असलेले गंगापूर व गंगापूर टोक हे दोन गावे दोन नद्याच्या मधात वसलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे अंतर्गत येत असलेल्या या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी फक्त डोंग्याचं वापर करून ये-जा करावं लागतो. पावसाळ्याच्या दिवसात दुथडी भरून वाहत जाणारी नदी प्रचंड रोद्र रूप धारण करून असते . अश्या परिस्थितीत नदी पार करून जाणे हे जीवाला मुकण्यासारखे असते. #Healthdepartment
तालुक्यातील कुणीही कोरोनाने मृत्यूमुखी पडू नये व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोरोना लसीकरण शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या माध्यमातून लसीकरणाचे कठीण काम सुरू आहे. त्यात शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात मोठे आवाहन आहे. #Adharnewsnetwork
पोंभूर्णा तालुक्याचे अगदी शेवटचे टोक असलेल्या व पावसाळ्यात चोहू भागाने पाण्याने वेढलेल्या दुर्गम भागातील गंगापूर गावाचे लसीकरण कसे करायचे हा यक्ष प्रश्न समोर उभा असतांनाच पोंभूर्ण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश मामीडवार यांनी हे आवाहन स्विकारून गंगापूर गावात लसीकरण पार पाडण्यासाठी लसीकरण मोहिम हाती घेतले.
आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन त्यांनी चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गावात दाखल झाले. गावात आशा वर्कर व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ३० आगस्टला कोव्हिशिल्ड लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. गंगापूर या गावाची संपूर्ण लोकसंख्या ३४० च्या आसपास आहे. गंगापूर गावातील लसिकरणासाठी पात्र असलेल्या १३६ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतली. आणि दुर्गम गाव असलेल्या गंगापूर गावात शंभर टक्के लसीकरण पुर्ण करण्यात आले.
गावात लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, तालुका सुपरवायझर सुरज डुकरे, आरोग्य सहाय्यक गजानन मेश्राम, आरोग्य सेवक सत्यनारायण सकनेरपवार ,आरोग्य सेविका आयशा मडावी,आरोग्य सेविका प्रियंका वाघमारे, आशा वर्कर पुष्पा डायले, वाहन चालक पराग चांदेकर, वाहन चालक पवन कोवे, डाटा एन्ट्री आपरेटर चिंटू कावलवार यांनी अथक परिश्रम घेतले.

जीव घेणी नदी तरीही , नागरिकांच्या आरोग्यासाठी दिली आरोग्य सेवा.

काही दिवसांपूर्वी दिनांक १९ आगस्टला काही पाहूणे गंगापूर गावात जाण्यासाठी नदीतून डोंग्याने प्रवास करित होते. मात्र अचानक पाण्याची पातळी वाढली आणि डोंगा पाण्यात डुबला यात एकाचा मृत्यू झाला व दोघे पोहता येत असल्याने बचावले. गंगापूर येथे पावसाळ्यातील हि भिषणता आहे. मात्र गावात साथीचे आजार व कोरोना पासून बचाव करण्यासाठी व तेथील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी जीवाची पर्वा न करता तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांनी गंगापूर गावात आरोग्य सेवा दिली. कोरोना या महामारी पासून आपले संरक्षण करता यावे यासाठी कोरोनाचे लसिकरण करून आदर्श निर्माण केला.
पोंभूर्ण्याच्या टोकावर वसलेल्या दुर्गम भागातील गंगापूर गावात आरोग्य यंत्रणेकडून शंभर टक्के लसीकरण पुर्ण करण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता गावकऱ्यांना लसीचे महत्त्व पटवून देत लसीकरण पुर्ण केले. मात्र शहरीकरणाचे जीवन जगणाऱ्या शहरी लोकांचे अजूनही लसीकरणाबाबतचे संभ्रम आहे. तळ्यात मळ्यात अश्या द्विधा मनस्थितीत असलेले शहरी नागरिकांचे लस घेणे सुरू आहे. गंगापूर या गावाचं आदर्श शहरी नागरिकांने घेतला पाहिजे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नदीतून डोंग्याने प्रवास करित धाडसी साहस करत लसिकरणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी जीवाची पर्वा न करता गंगापूर सारख्या दुर्गम भागातील गावात जाऊन शंभर टक्के लसीकरण पुर्ण केले. अधिकारी व कर्मचारी हे अभिनंदनास पात्र आहे. त्यांची हि आरोग्य सेवा नक्कीच स्मरणात राहील.
गंगाधर मडावी,
सदस्य, पंचायत समिती पोंभूर्णा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने