Top News

चंद्रपुरात महिलेची धारदार शस्त्राने हत्या. #Murder


आरोपी पती की तिची आई? याबद्दल संभ्रम. पोलीस तपासात होणार उघड.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई नगर अष्टभुजा परिसरात प्रगती जितेंद्र उंदीरवाडे वय 34 वर्ष या महिलेची सत्तूर ने वार करून हत्त्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली असून जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात सकाळी भरती करण्यात आल्यानंतर दिनांक 3/9/2021रोज शुक्रवार ला सायंकाळी 5.00 वाजताच्या सुमारास तिने जीव सोडला असल्याची माहिती हाती आली आहे. #Murder
रमाबाई नगर अष्टभुजा परिसरात जितेंद्र उंदिरवाडे व त्याची पत्नी प्रगती यांचे नेहमीच खटके उडत होते. कारण प्रगती ही नवऱ्यावर शंका घ्यायची की तुझे अनैतिक संबंध माझ्या आई सोबत आहेत. आणि तो म्हणायचा की तू एका मुलांसोबत आहे. दरम्यान या भांडणाची दखल घेऊन सहा महिन्यापूर्वी एक आमसभा (पंचायत) बोलावण्यात आली होती. त्या पंचायत मधे आता कुणी कुणावर शक घ्यायचा नाही म्हणून ठरले होते. मात्र मागील काही दिवसापासून पती पत्नीत मोठे वाद पुन्हा सुरू झाले होते .आणि सकाळी 7.45 वाजता प्रगती हीचेवर सत्तूर ने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असता सायंकाळी 5.00 च्या दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
त्यामूळे रमाबाई नगर मधे स्मशान शांतता आहे. आता ही हत्त्या पतीने केली की तिच्या सख्ख्या आई ने केली हे सद्ध्या गूलदस्त्यात असून पोलीस तपासात खरा आरोपी कोण हे निष्पन्न होणार आहे. या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने